Ad will apear here
Next
कासारवडवली-कळवा पोलीस ठाण्यालचे उद्घाटन
ठाणे : महाराष्ट्रात पहिल्यांदाच कन्स्ट्रक्शन टी. डी. आर. अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या कासारवडवली व कळवा येथील अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या लोकार्पणासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अक्षयपात्र योजनेतंर्गत माध्यान्ह भोजन मध्यवर्ती स्वयंपाक केंद्र, मोफत वाय-फाय, महापालिका शाळांमधील पहिली ते १० वीच्या विदयार्थांचा अपघात विमा योजना धोरण आणि दिव्यांग त्यक्ती संसाधन केंद्र अशा महत्वकांक्षी योजनांचे उद्घाटन केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या सर्व योजनांचे कौतुक करून ठाणे महानगरपालिकेच्या कामाचे गौरवोद्गार काढले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माहापालिकेच्या वतीने कासारवडवली व कळवा येथे कन्स्ट्रक्शन टी. डी. आर. माफत दोन भव्य व सर्व सोयी सुविधांनी युक्त पोलीस ठाणे बांधण्यात आली आहेत. कासारवडवली येथे ५९१.६७ चौरस मीटर भुखंडावर तळ अधिक पाच मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे तर सहाव्या मजल्याचे बांधकाम अशंतः पूर्ण झाले आहे. या इमारतीतील पाचव्या व सहाव्या मजल्यावर पोलिस अधिकाऱ्यांची निवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे ३.७९ कोटी खर्च आला आहे. तर कळवा येथे तीन हजार ५२९ चौरस मीटरच्या भुखंडावर तळ अधिक तीन मजल्याचे बांधकाम केले आहे. या इमारतीमधील दुसरा व तिसरा मजला पोलिस अधिकाऱ्यांच्या निवास स्थानासाठी तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस ठाणे बांधण्यात आली आहेत.

या दोन प्रकल्पांबरोबरच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोफत वाय-फाय प्रकल्प, महापालिका शाळांमधील पहिली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपघात विमा, महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील शाळा क्र.नऊ येथील दिव्यांग व्यक्ती संससधन केंद्र आणि अक्षयपात्र फाऊंडेशन व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पवार नगर येथील महापलिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांच्या माध्यांन्ह भोजन आहार योजनेच्या मध्यवर्ती स्वयंपाक केंद्राचे उद्घाटन केले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात नागरिकांसाठी पुढील दहा वर्षांसाठी मोफत वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना १०० रुपये भरुन नाव नोदणी केल्यानंतर ८०० केबीपीएस डेटा वापरण्यास मिळणार आहे. ८०० पेक्षा जास्त डेटा आवश्यक असल्यास त्यासाठी नागरिकांना वेगळी फी भरुन ती सुविधा प्राप्त करुन घेता येणार आहे. त्याच बरोबर महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २० एमबीपीएस इतका डेटा पुरविण्यात येणार आहे.

देशातच नाही तर जगभरात पहिल्यांदाच महापालिका शाळामध्ये इयत्ता पहिली ते १०वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. शहरातील आर्थिक दृष्टया दुर्बल, डोंगराळ व खाडी किनारी राहणाऱ्या महापालिकेच्या शांळामधील विद्यार्थ्याना २४ तास सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने ही अपघात विमा योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ५५ बालवाडया, १२५ मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दु माध्यंमाच्या प्राथमिक शाळा, १६ माध्यमिक शाळामधील ३७हजार ४१ विद्यार्थांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.दीड लक्ष, कायमचे अपंगत्व आल्यास रु. दीड लक्ष, अपघातामुळे एखादा अवयव निकामी झाल्यास रु. ७५ हजार, उपघातामुळे उद्भवलेल्या वैद्यकिय खर्चासाठी रु.३५ हजार इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.

आज या कार्यक्रमात महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तीसाठी संसाधन केंद्र हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यास क्षेत्राची ओळख होणे, बुध्दी कौशल्य, हस्तकौशल्य, उद्यमशिलता या बाबतचे प्रशिक्षन या संसाधन केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रगत संगणक प्रणाली, श्राव्य लायब्ररी व संगणक प्रशिक्षक सुविधा, ब्रेल लिपीतील पुस्तके आदी सुविधा देण्यात येणार आहे.

त्याच बरोबर महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना अक्षयपात्र योजनेतंर्गत पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन मध्यवर्ती स्वयंपाक केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. उक्षयपात्र फाऊंडेशन यांचे माध्यमातून अत्याधुनिक सुविधांचा वापर करुन हे मध्यवर्ती स्वयंपाक घर तयार करण्यात आले आहे. या शिवाय वृक्षारोपण प्रकल्प आणि शहर विकास विभागातंर्गत ईज ऑफ डुईंग बिझनेस पुस्तिकेचे देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी कळवा पोलिस ठाणे, वायफाय प्रकल्प आणि दिव्यांग संसाधन केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले. या समारंभास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हयांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, राज्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर, पोलिस आयुक्त परम बीर सिंह, उपमहापौर रमाकांत मढवी, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, समीर उन्हाळे, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BYWHBF
Similar Posts
‘सामुदायिक विवाहासारख्या उपक्रमांची गरज’ ठाणे : ‘सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली कल्पना असून, त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल, आज विवाह होणाऱ्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही नातेवाईक म्हणून सहभागी होऊ शकलो, माझे खूप आशीर्वाद,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार १०१ जोडप्यांना शुभेच्छा दिल्या
पोलिस स्टेशनचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कावेसर व पारसिक या दोन्ही सुविधा भूखंडांवर नव्याने बांधण्यात आलेल्या कासारवडवली आणि कळवा पोलिस स्टेशनचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
ठाणे, मीरा-भाईंदर उपनगरे मेट्रोने मुंबईला जोडणार ठाणे : नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई मेट्रो मार्ग-१०च्या ठाणे गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या मार्गावर मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात ठाणे, मीरा-भाईंदर व मुंबई शहरातील मेट्रो एकमेकांना जोडल्या जाणार असून, मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. ठाणे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language